Monday, 22 April 2019

वासंतिक शिबीर सैनिकी विद्यालय परिसर

दि १५ एप्रिल पासून सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित वासंतिक शिबीर सैनिकी विद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदीपर्वच. वर्षभर क्लासेसची शाळेची ये-जा, आभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना या सर्वापासून मुक्त असा काळ. या सुट्ट्या मध्ये धम्माल मज्जा करता यावी, त्यांच्याकडे असलेल्या निवांत वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी या कालावधीत शिबिराच्या माध्यमातून बालकांना छंद जोपासण्यास प्रवृत्त करून बालकांमध्ये जीवनावश्यक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, तसेच शारिरिक, बौद्धिक, मानसिक अशा सर्वांगाने त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवणे हे सर्व निश्चितच शक्य आहे. त्यासाठी मुलांसाठी हे दहा दिवसाचे उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या काळात प्रेरणादायी व्याख्यान, चित्रकला, रांगोळी, कथाकथन, साहसी मैदानी खेळ, कराटे, फुटबॉल, बास्केटबॉल, जलतरण, मल्लखांब, अश्वारोहण, नेमबाजी, संस्कारक्षम चित्रपट या उपक्रमांचा समावेश आहे. खास पालकांच्या आग्रहास्तव या शिबिराची दुसरी तुकडी २६ एप्रिल पासून ६ मे पर्यंत सुरु करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी श्री कुलकर्णी ९७६३२८३३९५, श्री वकील ९६७३२४६९१९, श्री कळकेकर - ८९७२९४६७९०,या क्रमाकावर संपर्क साधावा.









Monday, 18 September 2017

Taluka Winner Team

On Saturday, 16 Sept, our Std X cadets won the Taluka level volleyball competition and selected for Dist level.  The match was played at Khatgaon. our school cadet played this match vs Machnoor team.